आरोग्य विभागाच्या तपासणीत घंटागाडया पास

0
नाशिक । आरोग्य विभागाचे ठेकेदारांशी असलेले कथित अर्थपूर्ण संबंधामुळे पालिकेतील सत्ताधारयांनी आज सहाही विभागात घंटागाडयांची ओळखपरेड घेतली. या तपासणी सर्वच्या सर्व घंटागाडया हजर करत आरोग्य विभागाने महापौर, पदाधिकारी तसेच नगरसेवकांना तोंडघशी पाडले.

मंगळवारी महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील सहा विभागांत असलेल्या सर्व घंटागाड्यांची बुधवारी नगरसेवक तसेच सहा प्रभाग समित्यांचे सभापती तपासणी केली आहे. महापालिकेच्या एकूण 217 घंटागाड्या असून आरोग्य विभागाने घंटागाड्यांचे दिलेले आकडे आणि प्रत्यक्षात उपस्थित घंटागाड्यांमध्ये तफावत आढळल्यास थेट आरोग्य अधिकार्‍यांनाच निलंबित करण्याचा इशारा महापौर रंजना भानसी यांनी दिला होता.

त्यानुसार आरोग्य विभागाने जय्यत तयारी करत,बुधवारी प्रभाग समित्यांचे सभापती व तक्रारदार नगरसेवकांसमोर घंटागाड्यांची ओळख परेड केली.यात सहा विभागात घरोघरी कचरा संकलन करणार्‍या 167 घंटागाड्या उपस्थित होत्या असा दावा आरोग्य विभागाने केला आहे.त्यात नाशिक पूर्व 30,नाशिक पश्चिम 22,पंचवटी 34, सिडको 33, नाशिकरोड 26 आणि सातपूर मध्ये 22 अशा 167 गाड्या आढळून आल्यात.

तसेच लहान घंटागाड्या 19, हॉटेलसाठीच्या 7, गार्डन 6, ड्रेब्रिजसाठी 6 गाड्या आढळून आल्या आहेत. ठेकेदाराकडे अटी व शर्तीच्या अधीन राहून एकही घंटागाडी कमी भरली नसल्याचा दावा आरोग्य विभाागाने केला आहे.विशेष म्हणजे प्रभाग समित्यांचे सभापती,तक्रार दार नगरसेवकांसमोरच ही ओळख परेड केल्याने आता तक्रारदारांची तोंडे बंद होतील अशी आरोग्य विभागाला आशा आहे

LEAVE A REPLY

*