मंत्र्याच्या बॉडीगार्डसह गर्भपात करणार्‍या डॉक्टर दाम्पत्यास अटक करा

0

पीडित मुलीचा स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा 

अहमदनगर (प्रतिनिधी)- बालिकाश्रम रोडवरील एका तरुणीवर अत्याचार करून गर्भपात करण्यात आला होता. या घटनेतील आरोपी गणेश अकोलकर व बालिकाश्रम रोडवरील गर्भपात करणार्‍या डॉक्टर दाम्पत्यास आरोपी करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी पीडित मुलीने पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले आहे. आरोपींना अटक झाली नाही तर स्वातंत्र्यदिनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

दि. 26 डिसेंबर 2016 ते 6 एप्रिल 2017 या कालावधीत आरोपी गणेश अकोलकर याने एका तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला होते. या दरम्यान तरुणी गरोदर राहिली असता अकोलकर याने बालिकाश्रम येथील एका खासगी रुग्णालयात डॉक्टर दाम्पत्याकरवी गर्भपात केला होता. ही घटना घडून आता 2 महिने उलटत आले. तरी देखील पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने न पाहता आरोपी मोकाट सोडले आहेत.

ज्या डॉक्टरांनी गर्भपात केला, त्यांना पीडित मुलगी ही अविवाहीत असल्याचे माहिती होते. तरी देखील आरोपीशी सलगी करीत त्यांनी गर्भपात केला. पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना आरोपी करणे आवश्यक होते. मात्र असे झाले नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या तपासावर पीडित तरुणीने प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. या घटनेचा सखोल तपास केला असता तर पोलीस कर्मचारी, अकोलकर याच्या कुटुंबातील पीडित मुलीस मारहाण करणारे नातेवाईक, गर्भपात करणारे डॉक्टर यांच्यासह अन्य आरोपी होऊ शकले असते.

मात्र असे काही झाले नाही. पोलीस चौकशी सुरू असल्याचे सांगत आहे. दोन महिने उलटले तरी आरोपी मिळून येत नाही. राजरोस आरोपी पीडित मुलीस संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. ही बाब पोलिसांना सांगून देखील त्याचा पाठपुरावा केला जात नाही. त्यामुळे आरोपी हा एका बड्या मंत्र्याचा बॉडीगार्ड असून तो पोलीस खात्यात आहे. तसेच त्याचे पालक देखील पोलीस खात्यातील असल्यामुळे त्याला पाठीशी घातले जात आहे असा आरोपी पीडित मुलीने केला आहे. त्यामुळे पोलिसांकडून आपल्याला योग्य न्याय मिळत नाही म्हणून मंगळवारी (दि.15) ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मी अनाथ आहे म्हणून…
तपासाचा सारासार विचार करता आरोपी पोलीस कर्मचारी गणेश अकोलकर, गर्भपात करणारे डॉक्टर, मारहाण करणारे कुटुंबातील लोक, मध्यस्थी करणारे पोलीस कर्मचारी या सर्वांना पाठिशी घातले जात असल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे मी एक अनाथ मुलगी आहे. माझ्यामागे कुटुंब व संघटना नसल्यामुळे पोलिसांवर कोणताही दबाव नाही. त्यामुळे प्रशासन मला न्याय देण्यास समर्थ नाही. म्हणून 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वजाखाली आत्मदहन करणार असल्याची प्रतिक्रीया पीडित मुलीने दिली.

LEAVE A REPLY

*