गणेश विसर्जन मिरवणुकीत जर्मनीच्या पाहुण्यांची हजेरी; सेल्फीसाठी झुंबड

0
नाशिक | नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान अचानक विदेशी पाहुणे मिरवणुकीत सहभागी झाल्यामुळे गणेश मंडळांच्या भुवया पुरत्या उंचावल्या होत्या. अनेकांनी विदेशी पर्यटकांसोबत  फोटो काढण्यासाठी   गर्दी केली होती तर अनेकांनी सध्याचा ट्रेंड असलेल्या सेल्फि घेण्यासाठी  गर्दी केलेली दिसून आली.

आज दुपारपासून गणेश विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात प्रारंभ झाला. डीजेवर आधी बंदी होती, मात्र ती नंतर उठवली असली तरीही तुरळक गणेश मंडळांनी डीजे सजवून मिरवणुकीसाठी तयारी केली आहे.

तर कारवाईच्या धाकाने अनेक गणेश मंडळांनी डीजेपासून दोन हात लांब म्हणत पारंपारिक वाद्यांना पसंती देत विसर्जन मिरवणूक पार पडण्याचे ठरवले असल्यामुळे डीजेचा घनघणाट कमी झालेला नाशिकमध्ये दिसून येतो आहे.

पारंपरिक वाद्यांचा आवाज जर्मनीच्या पर्यटकांसाठी नवा आहे त्यामुळे त्यांनीही मिरवणूकीत मनमुराद आनंद लुटला. त्यांनीही नाशिकचा गणेश विसर्जन मिरवणूक कमेरयात कैद केली.

महापालिकेने उभारलेल्या स्वागत कक्षात या विदेशी पाहुण्यांना बोलावून त्यांचा अतिथी देवो भव म्हणत सत्कार करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*