Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : पेठ तालुक्यात विचित्र भूगर्भीय हालचाली; खडकातून निघतात पाण्याचे बुडबुडे

Share

पेठ | प्रतिनिधी

तालुक्यातील निरगुडे (क) येथील गावठाणलगत असलेल्या  शेतात आज दुपारपासून भूगर्भीय हालचालींमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

गावठाणच्या शेतातील खडकालगतच्या खड्डयामधून अचानक बुडबुडे निघत आहेत. विचित्र आवाज येत असून जमीनही काही प्रमाणत हलत असलायचे निदर्शनास आले आहे.

यामुळे परिसरातील जनतेत भीतीचे वातावरण आहे. याबाबत तहसीलदार हरेष भामरे यांनी घटना समजताच घटनास्थळी भेट दिली. तसेच बुडबुडे हवेचे असले तरीही भुगर्भातील वाफ नाही असे त्यांनी सांगितले आहे.

मात्र, याबाबतचा अहवाल मेरीच्या भूगर्भीय नियंत्रण कक्षास देण्यात आला असुन नागरीकांनी भिती बाळगु नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, येथील गोंदे, भायगाव, भुकंपप्रवण क्षेत्र जवळच असल्याने ग्रामस्थांमध्ये भिती असून यावर लवकरात लवकर तोडगा काढून हा काय प्रकार आहे ते उघडकीस आणावे अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!