गावठी कट्ट्यासह सात जणांची टोळी पकडली

0

नगर टाईम्स

एलसीबीची औरंगाबाद रस्त्यावर कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी)- दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील सात जणांना एलसीबीने पकडले. दोघे जण पसार झाले आहेत. नगर-औरंगाबाद रस्त्यावर रात्री पोलिसांनी ही कामगिरी केली. गावठी कट्ट्यासह पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

बिपीन रवसाहेब पवार (लक्ष्मीनगर, शिर्डी), महेश रामकरण विश्‍वकर्मा (नॉर्दन ब्रॅच, श्रीरामपूर), निरंजन तुकाराम थोरात (शिर्डी), आरिफ युनूस शेख (विरार इस्टेट, ठाणे), गोरक्ष नवनाथ कांबळे (हनुमाननगर, कोपरगाव), राहुल लक्ष्मण बंदीवान (नेवासा), मोसीन फिरोज शेख (सुभेदार वस्ती, श्रीरामपूर) असे अटक केलेल्या सात जणांची नावे आहेत. प्रदीप सुनील सरोदे (शिर्डी) आणि लखन प्रकाश माखिजा (श्रीरामपूर) हे दोघे पसार झाले आहेत.

दरोड्याच्या तयारीत काही जण असल्याची माहिती खबर्‍याकडून पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यांनी एलसीबीची टीम आरोपींच्या अटकेसाठी पाठविली. पोलीस गाडी पाहताच आरोपी पळू लागले. मात्र पोलिसांना पाठलाग करून सात जणांना पकडले. अंधाराचा फायदा घेत दोघे पसार झाले. पकडलेल्या आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा, तीन काडतुसे, तीन धारदार सत्तूर, मिरची पावडर, आठ मोबाईल, दोन मोटारसायकली असा 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्ेमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोसई सुधीर पाटील, उमेश खेडकर, मन्सूर सय्यद, फकीर शेख, विजय ठोंबरे, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, संदीप पवार, संदीप घोडके, विनोद मासाळकर, रोहिदास नवगिरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

LEAVE A REPLY

*