Sunday, April 28, 2024
Homeनाशिकगवळीनाथ महाराज रथोत्सव उत्साहात साजरा

गवळीनाथ महाराज रथोत्सव उत्साहात साजरा

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

येथील प्रसिध्द देवस्थान गवळीनाथ महाराज (Gavalinath Maharaj) व राज्यातील वडार समाजाचे (vadar community) आराध्यदेवता लक्ष्मीआई यात्रोत्सव सोहळ्यानिमित्त शहरातून रथोत्सवाचे (Chariot Festival) आयोजन करण्यात आले. कोरोनाच्या (corona) संकटामुळे दोन वर्षांनंतर हा यात्रोत्सव साजरा करण्यात आला असून शहरासह राज्यभरातील भाविकांनी यात्रेला गर्दी केली होती.

- Advertisement -

राज्यभरातून भाविक येत असल्याने यात्रा कमिटीकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. यात्रेच्या काही दिवस आधीच मंदिर व परिासरात विद्युत रोषणाई करण्यात आल्याने परिसर उजळून निघाला होता. यात्रेआधी मंदिर परिासरात किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमही (Religious programs) घेण्यात आले. रविवारी (दि.22) यात्रेनिमित्त पहाटे गवळीनाथ महाराजांच्या मुर्तीची विधीवत पूजा करण्यात आली.

यांनतर सकाळी रथयात्रेस प्रारंभ करण्यात आला. रथात सहभागी होण्यासाठी शहरातील भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. रथ ओढण्यासाठी शहरासह आसपासचे शेतकरी (farmers) आपली बैलजोडी घेऊन येत होते. शेतकर्‍यांनी आपल्ंया बैलांची आकर्षक सजावट केली होती. मंदिरापासून शहरातील प्रमुख मार्गांवरून रथ काढण्यात आला. दुपारनंतर रथ मंदिरात पोहोचल्यानंतर गवळीनाथ महाराजांच्या मुकुटाची महाआरती (Mahaarati), धार्मिक पूजाविधी करण्यात आली. यावेळी लक्ष्मी आई देवीचीही यात्रा असल्याने राज्यभरातील वडार समाजातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. रात्री मंदिर परिसरात शोभेची दारु उडवण्यात आली.

कुस्त्यांची दंगल

यात्रोत्सवानिमित्त आज (दि.23) मंदिर परिसरात कुस्त्यांची (Wrestling) दंगल भरवण्यात आली. दोन वर्षांनंतर यात्रेत कुस्त्यांचा कार्यक्रम झाल्याने कुस्ती बघण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी गर्दी केली होती. कुस्त्यांसाठी राज्यभरातून नामवंत मल्ल सहभागी झाले होते. विजेत्यांना रोख रक्कम देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय लोणारे, सगर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत वरंदळ, भाटवाडीचे सरपंच लोणारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या