गौरी लंकेश हत्या प्रकरण : मारेक-यांची ओळख पटली! कर्नाटक सरकारचा दावा

0

प्रसिद्ध पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात कर्नाटक सरकारने महत्वपूर्ण खुलासा केला आहे.

गौरी लंकेश यांच्या मारेक-यांची ओळख पटली असून त्यांच्याविरोधात सबळ पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे असे कर्नाटक सरकारकडून सांगण्यात आले आहे.

गौरी लंकेश यांचे मारेकरी कोण आहेत ते आम्हाला माहिती आहे असे कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

मारेक-यांची ओळख पटली ऐवढेच त्यांनी सांगितले. ते कोण आहेत, तपास कुठल्यादिशेने सुरु आहे याची सविस्तर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

अधिक माहिती उघड केल्यास तपासात अडथळे निर्माण होतील असे रामलिंगा रेड्डी यांनी सांगितले. 5 सप्टेंबरच्या रात्री गौरी लंकेश (55)  यांची बंगळुरुतील त्यांच्या राहत्या घराजवळ गोळया झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

*