ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना काही आठवड्यांमध्ये पकडू : कर्नाटकचे गृहमंत्री रेड्डी

0

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांचे मारेकरी येत्या काही आठवड्यांमध्ये गजाआड असतील असा विश्वास कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी व्यक्त केला आहे.

पुढच्या एक ते दोन आठवड्यांमध्ये मारेकरी पकडले जातील असे नाही, मात्र काही आठवड्यांमध्ये गौरी लंकेश यांचे मारेकरी गजाआड असतील असे रेड्डी यांनी स्पष्ट केले.

5 सप्टेंबर रोजी गौरी लंकेश यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) हल्लेखोरांविरोधात सबळ पुरावे आहेत. हे पुरावे नेमके काय आहेत हे आत्ता सांगणे योग्य ठरणार नाही.

एसआयटीने कोणत्या दिशेने तपास केला आहे याबाबत मला माहिती आहे असेही रेड्डी यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*