Friday, May 3, 2024
Homeनाशिकहळदी-कुंकू कार्यक्रमातून महिला सक्षमीकरणासाठी एकत्रित येणे काळाची गरज: सोनाली बोडके

हळदी-कुंकू कार्यक्रमातून महिला सक्षमीकरणासाठी एकत्रित येणे काळाची गरज: सोनाली बोडके

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

शहर महिला काँग्रेस (City Women’s Congress) प्रणित रणरागिणी फाउंडेशन महाराष्ट्र (Ranragini Foundation Maharashtra) राज्याच्या अध्यक्ष सोनाली शरद बोडके यांच्यावतीने व्दारकामाई शिवकृपा नगर हिरावाडी येथे मंडळातर्फे तीळ-गुळ वाटप, हळदी-कुंकू व उखाणे स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

पारंपरिक सणाला (traditional festival) आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण (Women Empowerment), स्वसंरक्षनासाठी (self defense) एकत्रित येणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सोनाली बोडके यांनी केले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या मिसेस इंडिया शिल्पी अवस्थी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. अवस्थी यांनी महिलांनी सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करायला हवे, स्वतःचे रक्षण करायला हवे, अन्याय अत्याचार विरोधात लढा द्यायला हवा, चूल आणि मूल नुसतं हे न बघता व्यवसायाच्या माध्यमातून सक्षमीकरण करायला हवे याविषयी मार्गदर्शन केले.

महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्यात आले. त्यानंतर महिलांवर वाढलेल्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त करत महिला सक्षमीकरणाबाबत (Women Empowerment) जनजागृतीपर विचार मांडण्यात आले. स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संगीत खुर्ची आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजातील महिलांसह ४५० पेक्षा अधिक महिला कार्यक्रमास उपस्थिती राहिली. या सर्व महिलांना फाउंडेशनच्यावतीने वाण देऊन सन्मानित केले गेले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे संस्थापक श्री शरद बोडके यांचे मार्गदर्शन लाभले.याप्रसंगी फाउंडेशनच्या शिला कदम, कमल गिते, कापडणीस, पल्लवी कदम,कल्पना देसले, स्वाती सोनवणे, सुर्यवंशी, लक्ष्मी चासकर, राधा बिडवे तसेच संतोष पाटील, गिते,कदम काका, आदी नागरिक उपस्थित होते. कांताबाई बटुळे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या