Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कळवण तालुक्यात गॅस्ट्रोची साथ; दोघांचा मृत्यू, ५० ते ६० रुग्णांवर उपचार सुरु

Share

पिंपळे खुर्द/पुनद खोरे | वार्ताहर

कळवण तालुक्यातील सावरपाडा येथे गॅस्ट्रो साथीची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. अतिसाराच्या त्रासामुळे दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कळवण तालुक्यातील जयदर प्राथमिक केंद्राअंतर्गत येणाऱ्या सावरपाडा या गावात रात्री १ वाजल्यापासून  दुषित पाण्यामुळे ८७  लोकांना उलटया आणि जुलाबाचा त्रास होत आहे. या घटने दोघांचा मृत्यू झाला आहे. तर इतर रुग्णांना  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  तर काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे समजते.

अतिसाराची लागण झाल्यामुळे चंद्रा तान्हू ठाकरे ( वय ७० ) व पढंरीनाथ अर्जुन बर्डे ( वय ७५ ) हे मयत झाले असल्याचे समजते. स्थानिक नागरीकांना याबाबत विचारले असता त्यांनी आरोग्य विभागावर ताशेरे ओढत सांगितले की, सावरपाडा हे गांव जयदर प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येत असुन येथील वैधकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांनी बऱ्याच दिवसांपासुन पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले नव्हते.

याबाबत आम्ही ग्रामस्थांनी त्यांच्या लक्षात पण आणून दिले पंरतु त्यांनी वेळ मारून नेली. वेळेत जर पाण्याची तपासणी केली असती तर हे प्रकरण घडले नसते. त्यामुळे यात प्रशासनाने चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी या वेळी सावरपाडा येथील ग्रामस्थांनी केली.


परिस्थिती नियंत्रणात 

मेन पाईप लाईन फुटल्याने दुषित पाणी होऊन सुमारे ८७ लोंकाना अतिसाराची लागण झाली आहे. यात ३० रुग्णांना जागेवरच उपचार केले असुन बाकीच्या रुग्णांना जयदर प्राथमिक आरोग्य केंद्र, कळवण उपजिल्हा रुग्णालय व नाशिक जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी पाठविण्यात आले असुन परीस्थीती नियंत्रणात आहे; त्याचप्रमाणे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.

डॉ . सुधीर पाटील . तालुका वैद्यकीय अधिकारी कळवण

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!