Type to search

सिन्नर : दापूर येथे गँस सिलिंडरचा स्फोट

Breaking News Featured नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

सिन्नर : दापूर येथे गँस सिलिंडरचा स्फोट

Share

चापडगाव | वार्ताहर

सिन्नर तालुक्यातील दापूर येथे गँस सिलिंडरच्या स्फोटात लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कुटुंबातील सदस्य घराबाहेर झोपलेले असल्यामुळे यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

ही घटना शरद रामनाथ गोफणे यांच्या घरी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत घराचे सिमेंट पत्रे, कपाट,सोफासेट, टीव्ही, गँस, घरातील वस्तू, कपडे सर्व जळुन खाक झाल्या. तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, सदस्य घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला. या घटनेत चार लाखांचे नुकसान झाले आहे.

घटनास्थळी तलाठी परदेशी, सरपंच मुक्ता मोरे, उपसरपंच अशोक काळे, ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड, विश्वनाथ मचकुले, अर्जुन आव्हाड, अशोक आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देत विचारपूस केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!