Friday, April 26, 2024
Homeनगरनगर : उद्यान विभागातील पाच कर्मचारी निलंबित

नगर : उद्यान विभागातील पाच कर्मचारी निलंबित

अहमदनगर (प्रततिनिधी) – महापालिकेच्या उद्यान विभागातील पाच कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार महापालिकेचे उपायुक्त प्रदीप पठारे यांनी ही कारवाई केली.

उद्यान विभागाचे मुख्य माळी नंदकुमार ढोणे, सफाई कामगार अनिल वाणे, वॉचमन नर्मदा बडे, भाऊसाहेब भोसले व राधाकिसन कोतकर अशी कारवाई झालेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत. या पाच जणांच्या निलंबनाबरोबर दोन जणांची उद्यान विभागातून बदली करण्यात आली आहे. प्रभारी आयुक्त द्विवेदी यांनी उद्यान विभागातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (ता. 16) बैठक बोलवली होती. या बैठकीला उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली होती. परंतु पूर्वसूचना देऊन देखील हे पाच कर्मचारी अनुपस्थित राहिले. या बैठकीला येताना कामकाजाचा अहवाल देखील मागितला होता. तो देखील या कर्मचार्‍यांनी सादर केला नाही. तो असमाधानकारक असाच आहे.

- Advertisement -

प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी या कर्मचार्‍यांच्या बेशिस्तीची गंभीर दखल घेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाईचा आदेश दिला. त्यानुसार महापालिकाचे उपायुक्त प्रदीप पठारे यांनी महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार या पाच जणांवर निलंबनाची कारवाई केली. या निलंबन काळात कर्मचार्‍यांनी गैरवर्तन केल्यास त्यांच्यावर पुन्हा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर या कर्मचार्‍यांना लेखी आदेशाशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या