गणपती बाप्पा….

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- सुखकर्ता, विघ्नहर्त्यां श्रीगणरायांचे आगमन आज गुरुवारी घराघरांत होत आहे. कलेचा सागर आणि विद्याधिपती श्रीगणेशाच्या स्वागतासाठी अवघा नगर जिल्हा सज्ज झाला आहे. बाप्पांच्या आगमनाची लगबग प्रत्येक घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये सुरू होती. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येक घराघरांमध्ये तसेच सार्वजनिक मंडपांमध्ये सजावटीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. बाप्पांना आवडणार्‍या लाडू, मोदकाच्या नैवेद्यांचा पाहुणचार घेत बाप्पांचे वास्तव्य राहणार आहे. त्यामुळे घराघरांत, चाळींमध्ये आणि मंडपांमध्ये आरती आणि भजनांचे आवाज घुमणार असून नगरकर भक्तीच्या सागरात न्हाऊन निघणार आहेत. गणेशोत्सवात सजावटीचे सामान, फुले, फळे तसेच अन्य वस्तूं खरेदीसाठी बाजारात भक्तांची लगबग सुरू होती. थर्माकोला बंदी असल्याने गणेशभक्तांनी इको फ्रेंडली मखरांचा पसंती दिली. काहीजणांनी रंगीबेरंगी पडदे वापरून गणपतीची सजावट करण्यावर भर दिला आहे.

LEAVE A REPLY

*