Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

गंजबाजारात एफडीएच्या अधिकार्‍यांना धक्काबुक्की

Share

पारीक डेअरी मालकाला अटक

अहमदनगर (प्रतिनिधी) – अन्न पदार्थाची तपासणीस मज्जाव करत अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकार्‍यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार काल बुधवारी सकाळी घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पारीक डेअरीच्या मालकाला अटक केली.

राजेश भगवान पारिक असे अटक केलेल्या डेअरी मालकाचे नाव आहे. एफडीएचे अधिकारी शरद मधुकर पवार (रा. सावेडी) यांनी पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी डेअरी मालक व नोकराविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

पवार हे पथकासह अन्न पदार्थांची तपासणी करण्याकरीता गंजबाजारातील पारीक डेअरी येथे पोेहचले. दुकानातील अन्न पदार्थाची तपासणी करत असताना पारीक व त्यांच्या नोकराने त्यांना मज्जाव करत धक्काबुक्की केली. अरेरावीची भाषा वापरत एफडीएच्या अधिकार्‍यांना दुकानाबाहेर काढले. त्यानंतर पथकाने पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दुकान मालक पारीक यांना अटक केली. दुकानातील नोकर मात्र पसार झाला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!