Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गंगापूर धरणसाठ्यात दोन टक्क्यांची वाढ; दारणा, भावली ५० टक्क्यांपेक्षा अधिक भरले

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक, त्र्यंबक व इगतपुरी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यासोबतच दारणा, भावली, कडवा आणि नांदूरमध्यमेश्वर धरणांच्या पाण्याची पातळीही वाढल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. आजच्या घडीला नांदूर मध्यमेश्वरमधून ३०० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.

पावसाचे वाढते प्रमाण बघून जिल्हाधिकाऱ्यांनी काल गोदावरी नदीकाठच्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना देण्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिकमध्ये शनिवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. कालपासून पावसाने दडी मारली असली तरीही गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे गंगापूर धरणात पाण्याचे प्रमाण वाढत आहे.

आज दोन टक्क्यांनी गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तर दारणा, भावली, कडवा आणि नांदूरमध्यमेश्वर धरणातही मोठी वाढ झाली आहे.

दारणा धरणाचाही साठा ३८ टक्क्यांवरून आज ५१  टक्क्यांवर गेला आहे. नांदूरमध्ये ६६ टक्के पाण्याचा साठा आहे.  पाच ते सहा तालुक्यांचा अपवाद वगळता इतर तालुक्यांमध्ये पावसाने अद्याप दडी मारली आहे.

त्यामुळे या क्षेत्रात मोडणार्‍या पुणेगाव, तीसगाव, भोजापूर, चणकापूर, केळझर, नागासाक्या व माणिकपुंज या सात धरणांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. या ठिकाणी दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!