Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : गंगापूर धरण ७९ टक्के भरले; दुपारनंतर गोदावरीत एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

Share

नाशिक | प्रतिनिधी  

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे दमदार आगमन झाल्याने गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. गंगापूर धरण आज सकाळी ७९ टक्के भरले असून प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, नदीकाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला असून वाहत्या पाण्यात उतरू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नाशिक परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीपात्राची पातळी काही प्रमाणात वाढली आहे. यंदाच्या पावसाळ्यात गोदावरी दुसऱ्यांदा खळाळून वाहत असून गंगापूर धरणाची पाण्याची पातळी गेल्या २४ तासांत पाच टक्क्यांनी वाढ होऊन धरण जुलै महिन्यातच ७९ टक्के भरले आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्याबाबतचा निर्णय आज प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

शहरातील होळकर पुलापर्यंतच्या भागात गोदावरीची पाणी पातळी पात्रा उथळ असल्यामुळे पुलाखालून गांधी तलाव आणि रामकुंडाकडे वाहताना प्रचंड वेगाने वाहते आहे. अजूनही याठिकाणी अनेक पर्यटक वाहत्या पाण्यात धोकेदायक सेल्फी काढताना दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून याठिकाणी धोक्याचा इशारा देण्यात आला असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गंगापूर धरणातून विसर्ग केल्यानंतर गोदावरीत हे पाणी दीड ते दोन तासांत नाशिक शहरात पोहोचते. यशवंतराव महाराज पटांगण परिसर आणि मंदिरे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

गोदावरीच्या पुराचे परिमाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत सकाळीच पाणी पोहोचले आहे. दुपारी यात वाढ होणार असून दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी असल्याची शक्यता आहे.

गोदावरीच्या वाढत्या पातळीचे हे दृश्य पाहण्यासाठी आणि ते मोबाइलच्या सेल्फीत टिपण्यासाठी अनेकांचे कॅमेरे सरसावले आहेत. त्यांनाही प्रशासनकडून धोक्याच्या जागी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!