Video : रामकुंडावर गंगापुजनाचा सोहळा; समर्थ सेवेकऱ्यांचे पर्जन्यास साकडे

0

नाशिक : श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने गंगा दशहरा उत्सवाच्या निमित्ताने रामकुंडावर गुरूमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते गंगापुजनाचा सोहळा शेकडो सेवेकरयांच्या उपस्थितीत झाला.

याप्रसंगी महिला व पुरूष सेवेकरयांनी पर्जन्य सूक्ताचे सामुहिक वाचन करून पर्जन्य राज्यास साकडे घातले. या सोहळयासाठी पालकमंत्री गिरीष महाजन, आमदार सिमा हिरे, देवयानी फरांदे, हेमंत गोडसे, नगरसेविका वत्सला खैरे, हर्षा बडगुजर, सतिष शुक्ल यांनी उपस्थित राहून गंगापूजनात सहभाग घेतला.

ज्येष्ठ महिन्यातील शुध्द 1 ते 10 या कालावधीत सर्वत्र गंगापुजन केले जाते. गंगा गोदावरी मातेचे उगमस्थान त्रयंबकेश्वर सागरास मिळते ते पवित्र संस्थळ राजमेहंदी राजस्थान अशा शेकडो मैलांच्या गोदाकाठावर जेथे शक्य होईल तेथे समर्थ सेवेकरी भाविक गंगापुजन करून जीवन समृध्द करणारया या मातेचा सन्मान करून तिच्या माध्यमातून पर्जन्य राज्यास साकडे घालतात.

जेथे गेादामाता नाही तेथे त्या त्या गावातून प्रवाहित होणारया नद्यांचा भावनपूर्ण सन्मान समस्त सेवेकरी करतात. गंगापूर रोडवरील उदयनगर समर्थ केंद्रातून गंगाजल कलशाची भव्य मिरवणुक काढण्यात आली ही मिरवणुक रामकुंडासवर पोहाताच महिला पुरूष सेवेकरी गंगापूजनाच्या सेाहळयात सहभागी झाले.

गंगा गोदावरी मातेस दुग्धाभिषेक तसेच महावस्त्र अर्पण करूनपुरोहित संघाचे सतिश शुक्ल आणि सहकारयांनी केलेल्या मंत्रघोषात गुरूमाउलींसह सर्वांनी गंगापूजन केले. पुजनानंतर उपस्थितांशी संवाद साधतांना गुरूमाउली म्हणाले की आज आपण गंगा गोदावरी मातेच्या साक्षीने पर्जन्य राज्यास साकडे घातले आहे. जीवसृष्टीला नवचैतन्य लाभावे यासाठी हा सोहळा आहे.

बळीराजापुढील विविध शेतकरंयाच्या आत्महत्या थांबविण्यास मदत होईल बळीराजापुढील विविध शेतकरयांच्या आत्महत्या थांबविण्यास मदत होईल.

LEAVE A REPLY

*