म्हाळुंगी नदीत वाहून गेलेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला
Share

सिन्नर / वार्ताहर
तालुक्यातील ठाणगाव येथे गण्या डोह बंधाऱ्यावरुन म्हाळुंगी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह पाचव्या दिवशी म्हणजेच आज (दि.3) सकाळी नदीपात्रात तरंगलेला आढळून आला. सावळीराम काशिनाथ मेंगाळ ( वय 35 रा. काळेवाडी) असे या तरुणाचे नाव आहे.
मंगळवारी दुपारच्या सुमारास एक व्यक्ती बंधाऱ्यावरुन पुरात वाहून गेल्याचे गुराख्याने पाहिले होते. मात्र ती व्यक्ती कोण? याचा उलगडा होत नव्हता.
दरम्यान, जवळच असलेल्या काळेवाडीतील तरुण सावळीराम रात्री उशिरापर्यंत घरी परतला नव्हता. त्यामुळे तर्कवितर्क वाढले होते. या व्यक्तिचे शोधकार्य सुरु होते. मृतदेह आढळून आल्यावर वाहून गेलेला व बेपत्ता असलेला तरुण एकच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.