चाकूने हल्ला करणारी टोळी गजाआड ; सहा घटना उघडकीस

0

नाशिक | दि.०२ प्रतिनिधी

मध्यरात्रीच्या सुमारास ऍक्टीव्हा मोटारसाकलवर ट्रीपलसीट येऊन, रस्त्याने एकट्या व्यक्तीला गाठून काही समजण्याअगोदर चाकू भोकसून जवळील रोकड, दागिणे व मोबाईल लूटणार्‍या टोळक्यास शहर पोलीसांनी पोलीसांनी शुक्रवारी रात्री गजाआड केले. या टोळक्याने विविध ठिकाणी ६ जणांवर चाकू हल्ला करून लुटल्याची कबुली दिली आहे.

गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी ही कामगिरी केली आहे. या तीनही अल्पयींना संशयीतांना नाशिकरोड पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यांनी नाशिकरोड, उपनगर, मुंबईनाका, द्वारका, शरणपूररोड, पाथर्डी फाटा या ठिकाणांवर चाकू हल्ला करून सहा जणांना लूटल्याची कबुली त्यांनी दिली.
शनिवारी (दि.२५) कामावरून घरी येत असलेला ज्ञानेश्‍वर कुमावत (१९, रा. चेहडी पपींग रोड) यास नशिकरोड परिसरातील चेहडी शिवारात निसर्ग लॉन्स येथे रात्री १२.३० वाजेच्या सुमारास ऍक्टीवा आडवी लावून डोक्यावर चाकूने वार करून लूटण्यात आले होते. त्याच्याकडून रोकड, चांदीची चैन व रोकड असा साडेचार हजाराचा मुद्देमाल पळविण्यात आला होता. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर याच दिवशी शहरातील विविध ठिकाणी याच पद्धतीने हल्ला करून लूटल्याच्या घटना घडल्या होत्या. याची दखल घेत पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी हल्ला करून लूटण्याची पद्धत व मोटारसायकल यावरून गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दोन्ही परिमंडळातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना शोध घेण्यास सांगीतले होते. हा शोध घेत असताना सातपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी एस. आर. साळवे यांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून ऍक्टिवा (क्र. एमएच १५ ईटी २६५२) वरून शुक्रवारी मध्यरात्री फिरणार्‍या तीन अल्पवयीन युवकांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता तीघांनी सर्व गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चांदीची चैन, चाकू, मोटारसायकल, रोकड असा सुमारे ६० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*