Type to search

Featured सार्वमत

मजहब नही सिखाता… बैर रखना

Share

नगर टाइम्स,

उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांची एकता रॅली

अहमदनगर (प्रतिनिधी)– गणेशोत्सव, मोहरम आणि नवरात्रौत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शहरात आज (शनिवारी) एकता रॅली काढली. सर्वधर्म समभावाचा संदेश त्यातून देण्यात आला. रॅलीत शालेय विद्यार्थी, विविध धर्मियांची पारंपरिक वेशभुषा परिधान केलेले विद्यार्थी सहभागी झाले. रामचंद्र खुटं येथून सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एकता रॅलीस जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी झेंड दाखवून प्रारंभ केला. दाळ मंडई, तेलीखुंट, कापडबाजार, भिंगारवाला चौक, अर्बन बॅक रोड, नवीपेठ, नेता सुभाष चौक, चितळे रोड, दिल्ली गेट मार्गे रॅलीचा पोलिस मुख्यालयात समारोप झाला. गुरूवारपासून (दि.13) गणेशोत्सव सुरू होत आहे.

तसेच 20 तारखेला मोहरम तर पुढच्या महिन्यात नवरात्रौत्सव आहे. हे उत्सव सर्वधर्मियांनी शांतते साजरे करावे यासाठी ही एकता रॅली काढण्यात आली. रॅलीत सुमारे दोन हजार शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मार , प्रातांधिकारी उज्ज्वला गाडेकर, डीवायएसपी संदीप मिटके, कोतवालीचे पीआय नितीन गोकावे, तोफखान्याचे पीआय संपत शिंदे, वाहतूकचे पीआय अविनाश मोरे, विविध शाळाचे प्रतिनिधी विद्यार्थी, शांतता समिती सदस्य, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार, यांच्यासह विविध समाजाचे प्रतिनिधीनी रॅलीत सहभाग घेतला.

हम सब एक है
रॅलीच्या पुढे पोलीस दालाचे बॅण्ड पथक, विविध धार्मितील पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. हम सब एक है, आपस मे बैर मत रखना… असा संदेश यातून दिला गेला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!