‘आर्टहब’ची गणेशमूर्ती कार्यशाळा

0
नाशिक । पर्यावरणाचा संतुलन राहावे आणि सण-उत्सवाचा आनंद द्विगुणीत व्हावा, या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणस्नेही गणेशउत्सव ही संकल्पना रुजली आहे.

‘आर्टहब’ तर्फे येत्या शनिवारी (दि.13) सिटी सेंटर मॉल येथे ‘इको फे्रेंडली’ गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारी 12 ते 3 दरम्यान होणार्‍या कार्यशाळेसाठी पूर्व नोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी समर्थ नगर येथील पीएनआर, कॉलेज रोडवरील अंजली स्टोअर्स किंवा महात्मा नगर येथील महालक्ष्मी आर्ट स्टोअर, किंवा 8600633383 या क्रमांकावर कॉल करून नोंदणी करावी असे आवाहन ‘आर्ट हब’ अश्विनी देशपांडे यांनी केले आहे.

कार्यशाळेत सहभागी घेऊ इच्छिणार्‍यांनी सोबत ए-3 आकाराचा पुठ्ठा, 1 लिटर पाणी सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.

‘आर्टहब’सामाजिकते पंख : ज्या समाजात आपण राहतो त्याचे काही देणे लागतो, हे ब्रीद ‘आर्ट हब’ने डोळ्यांसमोर ठेवत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत.

अश्विनी देशपांडे या बालसुधार गृहातील मुलांसाठी नीतीमत्ता शिक्षण, अनाथाश्रमातील बालकांसाठी कलात्मक वस्तू आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा नियमित घेत असतात.

झोपडपट्टीतील महिलांसाठी दि. 5 ऑगस्टपासून ‘इको-फेंड्रली’गणेशमूर्ती कार्यशाळा सुरू असून अनेक महिला मूर्ती बणवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत.

LEAVE A REPLY

*