Type to search

Featured मुख्य बातम्या राजकीय सार्वमत

वांबोरीत विसर्जनाच्या दिवशी तरुणाला जबर मारहाण

Share

हवेत गोळीबार झाल्याची चर्चा

उंबरे (वार्ताहर)- राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे गणेश विसर्जनाच्या दिवशी गणेश भागवत खिलारी (वय 36) यास बेदम मारहाण करून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे वांबोरी परिसरात दहशत पसरली आहे. ही घटना गुरूवार दि. 12 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंपासमोर घडली. खिलारी हा गंभीर जखमी झाला असून त्याला नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.  

दरम्यान, याप्रकरणी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले.
वांबोरी येथे सुभाषनगर येथील रहिवासी असलेले खिलारी हे दुर्गा गणेश मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत. तसा फलकही गणेश प्रतिष्ठापनास्थळी बसविण्यात आला होता. मात्र, तेथे मंडळातील कार्यकर्त्यांच्या फलकावरून खिलारी व त्या मंडळातील काही तरुणांची बाचाबाची झाली. त्यानंतर चार दिवसांनी या मागील भांडणाचे पर्यावसान हाणामारीत(पान 10 वर) झाले. यावेळी खिलारी यास बेदम मारहाण करण्यात आली.

त्यानंतर घटनास्थळी एका तरूणाने हवेत गोळीबार केल्याचीही चर्चा दरम्यान, मारहाण झाल्यानंतर खिलारी याने थेट राहुरी पोलीस ठाणे गाठले. तेथे आल्यानंतर तो बेशुद्ध पडला. पोलिसांनी त्याला तातडीने नगर येथील रूग्णालयात हलविले. घटनेची माहिती समजताच वांबोरी परिसरातून मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

श्रीरामपूरचे डीवायएसपी राहुल मदने, राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख हे पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले. यावेळी दोन तरूणांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. गोळीबार झाला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!