मनपा प्रशासनाकडून गणेशोत्सवाची तयारी सुरू!

0

मोठ्या गणेश मूर्ती सार्वजनिक विहिरीत विर्सजनास बंदी

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशमंडळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मूर्तींची संख्याही वाढणार आहे. चार ते पाच फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती सार्वजनिक विहिरींमध्ये विसर्जित करण्यास महापालिकेने यंदा बंदी घातली आहे. मनपा प्रशासनाने शहरातील गणेश उत्सवाची तयारी सुरू केली आहे. यंदा दोनशेपेक्षा जास्त सार्वजनिक गणेशमंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत. याशिवाय बालमंडळे, अपार्टमेंट, सोसायटी, घरगुती मंडळामध्येही मोठ्या मूर्ती बसविल्या जातात. मोठ्या मूर्तींचे विसर्जन करणे विहिरींमध्ये अशक्य होते. शिवाय मोठ्या मूर्तींच्या विटंबनाची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर शहरातील बोल्हेगाव, नागापूर, केडगाव, यशोदानगर आणि बाळाजीबुवा विहीर येथे महापालिकेमार्फत वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिकेचे पथक मोठ्या मूर्ती स्वीकारणार आहे. या मूर्ती तलाव, जलाशयांमध्ये विसर्जित करण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त राहुल द्विवेदी यांनीच अधिकार्‍यांना नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

*