Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Blog : हतबल ‘बादशहा’…

Share

नाशिक । गणेश सावंत

देशासह राज्यभरात एकापाठोपाठ येणार्‍या व विविध नावे धारण केलेल्या चक्रिवादळांमुळे सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. निसर्गाने मानवाला एकप्रकारे मला गृहित धरू नका, असा इशाराच दिला आहे, तद्वतच, मतदारांनीही सर्वच राजकीय पक्षांना आम्हाला गृहित धरू नका, असा संदेश विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून दिला आहे. त्यामुळे सर्व विक्रम मोडीत काढून राज्याचा ङ्गबेताल बादशहाफ बनू पाहणार्‍यांच्या चेहर्‍यावर उद्विग्नता आली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकाकी पडलेला हा ङ्गबादशहाफ आता कोणती नवी खेळी करणार? याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचा काल (मंगळवारी) तेरावा दिवस होता. धार्मिक, पौराणिक, पारंपरिकदृष्ट्या विचार केला तर ङ्गतेरावाफ दिवस हा मुक्तीचा दिवस. 13 दिवस जी काही बंधने असतात, ती पाळून ङ्गगोडा-धोडाफचे जेवण करून दुःख विसरून पुन्हा एकदा प्रापंचिक दिनचर्या सुरू करण्याचा दिवस म्हणजे ङ्गतेरावाफ दिवस. मात्र, हा दिवस उलटून आज बुधवार चौदावा दिवस झाला तरी, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईल…

असे त्रिवार सांगणारा ङ्गबादशहाफ मात्र पुर्णतः बांधला गेला आहे. पुरेसे बहुमत मिळविता न आल्याने स्वकियांसह ज्यांचे गुण आत्मसात केले त्या दिल्लीच्या गादीने दुर्लक्षित केले. तेही साहजिकच आहे म्हणा… पक्षांतर्गत विरोधकच असू नये याच ङ्गउदात्तफ हेतुने बादशहाने वजीरासह सर्वच अन्य सहकार्‍यांचा कधी थेट तर कधी काट्याने काटा काढला. त्यामुळे सर्वांनीच आता ङ्गबादशहाफलाच एकाकी पाडले. भांडखोर मित्र दिलदार असतो म्हणतात. तो पाठीत वार करीत नाही, असे म्हणतात.

अशा मित्रालाही गरज सरो वैद्य मरो या म्हणीनुसार दूर ठेवले. त्याच्यावर वक्रदृष्टी टाकली. सद्यस्थितीत बादशहाच्या या वर्तनाला ङ्गअतीफ आत्मविश्वास असेच म्हणता येईल. कारण राज्याची ङ्गरयतफ माझ्यावर खुश आहे. मी त्यांच्या भल्याचे निर्णय कायमच जाहीर केले. (जाहीर केले असेच म्हणावे लागेल. कारण त्यापैकी काही निर्णयांची अंमलबजावणी झाली असती तर बादशहाला नक्कीच बहुमत प्राप्त झाले असते.) त्यामुळे मीच एकमेव बादशहा राज्यावर राज्य करणार, महाजनादेश घेणार, अशी बादशहाला खात्रीच होती.

पण… बादशहाच्या मार्गात जाणत्या राजाने काटे पेरले, रयतेलाही बादशहाच्या सत्तेतून फार काही हाती लागले नव्हते. बादशहाच्या घोषणा म्हणजे बोलाचाच भात… असल्याची रयतेची खात्री पटली होती आणि मग रयतेने निर्णय घेतला आणि बादशहाचा निकाल लावला. आज बादशहाची अवस्था केविलवाणी झाली आहे.

जे कधीच जवळ नव्हते, ते ङ्गजाणत्या राजाफचे मार्गदर्शन घेत आहेत. जे जवळ आणि विश्वासू होते, बादशहामुळे ज्यांना जीवनाचा अर्थ कळला तेही आता दूर जाऊ लागले आहेत. कारण बादशहाला आता रयत, दिल्लीची गादी यांचे फार काही आशीर्वाद राहिलेले दिसत नाहीत. अशा स्थितीत आपण बादशहाची संगत केली तर सद्यस्थितीत ती असंगाशी संग अशाच प्रकारची ठरविली जाईल, आणि आपली रसदच बंद होईल, अशी भीती या विश्वासू सहकार्‍यांना वाटू लागली आहे.

बादशहाने पाच वर्षे निरंकूशपणे सत्ता राबविली. सर्व शत्रूंवर मात केली, राज्यात आपण एकमेव बादशहा आहोत, अशा गुर्मीत कारभार केला, पण ये पब्लिक है, सबकुछ जानती है असे म्हणत रयतेनेच बादशहा धडा शिकविला. त्यामुळे दिल्लीची गादी गडकरी असे सर्वच चार हात लांब झाले. तुमचे तुम्ही निस्तरा म्हणू लागले. त्याचवेळी जाणत्या राजाने वर्मावर घाव घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच बादशहाची आजची अवस्था आई जऊ घालीना, बाप भीक मागू देईना अशी झाली आह. त्यास अर्थातच बादशहाच पूर्णतः जबाबदार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!