video – भिंगारमधील गणेश विर्सजन मिरवणूक पोलीसांच्या देखरेखीखाली सुरू

0

 

अहमदनगर(प्रतिनिधी) – शहरातील भिंगार येथे श्री गणेशाच्या मिरवणुकीत 11 मंडळे सहभागी झाली आहेत. तीन गणेश मंडळे विसर्जनाच्या वाटेवर असून बाकी आठ मंडळे ढोल ताश्यांच्या गजरात पुढे सरकत आहे. दरम्यान एक डिजे वाजण्याच्या आधीच पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
तर एका मंडळाने डिजिटल बँण्ड लावला असून पोलिसांनी त्याचे डेसीबल मोजले असता ते मर्यादेपेक्षा अधिक भरले आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
ध्वनी प्रदूषणाचा डांगोरा पिटणारे पोलीस या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करतात की, राजकीय दबावाचे बळी पडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर अशा डिजिटल बँण्डवर कारवाई झाली नाही तर याचा परिणाम उद्या येऊ घातलेल्या शहरातील मिरवणुकीत देखील होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*