गणेश मंडळांची नोंदणी आता ऑनलाईन

0

जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना दिलासा

अहमदनगर – जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना नोंदणीसाठी आता धर्मादाय कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. आता ऑनलाईन नोंदणी करुन 41 क चे प्रमाणपत्र मिळवावे, असे आवाहन धर्मदाय उपआयुक्त विभागाने केले आहे.
गणेश मंडळांना ऑनलाईन नोंदणीसाठी मंडळाचे नाव, पत्ता, अर्जदाराचे नाव, मोबाईल क्रमांक, मालमत्ता, अंदाजे जमा होणारी रक्कम, सभासद नाव, पद व अर्जातील सर्व माहिती ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. यासाठी ईमेलआयडी व मोबाईल क्रमांक अचुक असावा. तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, जागेचा उतारा, प्रतिज्ञापत्र, ना हरकत दाखला, अजेंडा, ठरावा इत्यादी कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावे.

नोंदणी पध्दत :

  • अधिक माहितीसाठी सदर पोर्टलवर प्रणाली मार्गदर्शनमध्ये परवानगी 41 क खाली माहिती उपलब्ध आहे.
  • मंडळांना charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करावे.
  •  Register User  वर जाऊन आवश्यक ती माहिती भरुन User Creat करावा.
  • User व पासवर्डने Login व्हावे – Register an Event (41 सी) यावर क्लिक करावे.
  • आवश्यक ती माहिती अर्जात भरावी. उपरोक्त सर्व कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करुन सबमिट करावे.
  • आपणास auto generated क्रमांक मिळेल. अर्जावर झालेली कार्यवाही मोबाईल एसएमएसने मिळत राहील.
  • ज्यावेळी आपला अर्ज मंजूर होईल. त्यावेळी आपणास दिलेल्या ईमेलवर आपले प्रमाणपत्र मिळेल.

 

LEAVE A REPLY

*