अभोण्यात गणपती मूर्तीसाठी लगबग

0

अभोणा (वार्ताहर ) ता.१४ :  पावसाने उघडीप दिल्यामुळे मूर्तिकार आता देव घडविण्याच्या कामात गढून गेले आहेत.

गणेशोत्सव फक्त ११ दिवसांवर येऊन ठेपल्याने मुर्तिकारांपुढे वेळेत काम संपवण्याचे आव्हान आहे.

यंदा पावसामुळे मध्यंतरी बराच वेळ वाया गेल्यामुळे येत्या २५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी आठ दिवस अगोदरपर्यंत सर्व गणेश मुर्ती पूर्ण कराव्या लागणार आहेत.

अभोणा परिसरातील मूर्तिकार सुमित मुठे म्हणाले की सध्या मंडळांच्या मोठय़ा म्हणजे पाच ते दहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत.

प्लास्टर ऑफ पॅरिस, नारळाच्या शेंड्या यांचा लगदा करून साचा करून काही मूर्ती बनविण्यात आल्या आहेत. काही गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींच्या ठरलेल्या ऑर्डर आहेत,  त्या मूर्तिकार बांधवांनी साकारायला सुरुवात केली आहे.

गेल्या काही वर्षांत देखावे करण्याऐवजी आकर्षक गणेशमूर्तीची स्थापना केली जात असली,  तरी बहुतांश मंडळांनी एकच प्रकारची गणेशमूर्ती कायमस्वरूपी ठरवून दागिने बनवून घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे मूर्तीचे सौंदर्य तर वाढतेच; पण मंडळांकडेही संपत्ती जमा होते.

कच्च्या मालाचे भाव वाढल्यामुळे यंदाही मागील वर्षाच्या तुलनेत गणेश मुर्तीच्या किंमतीमध्ये किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे.

 

 

LEAVE A REPLY

*