Type to search

नाशिक

“गणेशोत्सवात जुगार खेळण्यासाठी परवानगी द्या”

Share

चांदवड (हर्षल गांगुर्डे) ता. ८ : चांदवडला शांतता समितीच्या बैठकीत पोलिस अधिकारी नागरिकांच्या सूचना मागवत असताना येथील दिगंबर राऊत या नागरिकाने माईक हातात घेत गणेशोत्सवात चक्क जुगार खेंळण्याची परवानगी द्यावी अशी अजब मागणी केल्याने या बैठकीचा माहोलच काही काळ बदलून गेला.

मात्र काय झाले हे लक्षात आल्याने त्यांनी मुलांना रात्रभर वेळ काढण्यासाठी मनोरंजन म्हणून बिना पैशाचा जुगार खेळू द्यावा असा तर्क त्यासोबत जोडला. यावेळी व्यासपीठावर अनेक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी उपस्थित होते त्यांना तर डोक्याला हात लावायची वेळ आली.

अर्थात चांदवड पोलीस स्थानकाचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी लगेचच हातात माईक घेऊन “संविधानिक शब्दात या नागरिकाच्या मागणीचा  समाचार घेतलाच, याशिवाय सगळ्याच नागरिकांना तरुणांना या जुगाराच्या खाईतून बाहेर काढण्याचे आवाहन करत जुगारी मंडळी वर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारची गय करणार नाही अशी तंबी दिल्याने सुजाण नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!