मालेगावी पावसाच्या सरींत श्रींचे आगमन

0

मालेगाव (प्रतिनिधी) ता. २५ : मालेगाव शहरात पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात श्रीगणेशाचे आगमन झाले.

श्रींच्या आगमनाच्या वेळेसच पावसाच्या सरींनी सलामी दिली. त्यामुळे गणेशभक्तांचा उत्साह दुणावला.

येथील प्रसिद्ध मातामठ तालिम संघाच्या गणेशोत्सवात ढोल ताशांच्या गजरात गणरायांचे आगमन झाले.

शहरात सुमारे ३०० सार्वजनिक मंडळांतर्फे श्रींची स्थापना करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*