सांस्कृतिक कार्यक्रमांनी सिडनीकरांनी साजरा केला गणेशोत्सव

0

देशदूत डिजिटल विशेष

सिडनी, ता. २६ : भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

येथील सिडनी मराठी असोसिएशनने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुढाकार घेतला होता. यंदा येथील माँन्टगोमेरी रस्तावरील सेंट जॉर्ज ऑडिटोरियममध्ये संगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सारेगमप फेस मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी या कार्यक्रमात संगीताचे विविध प्रकार सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.

देशदूत डिजिटलचे वाचक शेखर जाधव यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्री जाधव हे मूळचे औरंगाबाद येथील असून सध्या ते नोकरीनिमित्त सिडनी येथे स्थायिक झाले आहेत.

(व्हिडिओ : श्री शेखर जाधव यांच्या फेसबुक वॉलवरून साभार)

LEAVE A REPLY

*