एक लाखापेक्षा अधिक केळींनी साकारलेले गजवदन; भागविणार गरिबांची भूक

0

गोवा : सगळीकडे गणपतीच्या आगमनाची जोरदार तयारी चालू असून काही तासांतच गणराय घराघरात आगमन होणार आहे.

देशभर गणपती आरास तसेच पर्यावरण पूरक गणपती साकारण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या संकल्पना वापर करून निसर्ग व भावनांचा संगम घालताना दिसत आहे.

असाच एक प्रकार गोव्यातील एका खेड्यात करण्यात आला आहे. या ठिकाणी एक लाखापेक्षा अधिक कच्च्या केळीच्या तसेच बांबूच्या साहायाने गणेश साकारला आहे. गणपतीच्या दहा दिवसांत हि केळी पिकल्यानंतर गोरगरिबांमध्ये तसेच भाविकांमध्ये वाटण्यात येणार आहे. त्यामुळे या गणपतीकडे विशेष म्हणून पहिले जात आहे. पर्यावरण पूरक तसेच कुठलाही बडेजाव न करता, किंवा गोंगाट न करता गणरायाची आराधना यातून करण्यात आली आहे. तसेच इतर गणेश मंडळांना आदर्श घालून दिला आहे.

LEAVE A REPLY

*