Type to search

maharashtra आवर्जून वाचाच गणेशोत्सव मुख्य बातम्या

लाडक्या बाप्पाचं जल्लोषात आगमन

Share
मुंबई – लाडक्या गणपती बाप्पाचं घराघरात, सार्वजनिक मंडळांमध्ये ढोलताशाच्या गजरात जल्लोषात आगमन झालेले आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, या जयघोषात भक्तांनी आपल्या गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. गणेशोत्सव मंडळांनी वाद्यांच्या गजरात काढलेल्या गणेशमूर्तींच्या मिरवणुका व फुललेल्या बाजारपेठा यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे. लालबागच्या राजा, गणेश गल्लीचा राजा आणि सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ-मोठ्या रांगा लागल्या आहेत.

आज पहाटेपासूनच बाप्पांना घरी नेण्यासाठी चित्रशाळांबाहेर रांगा लागल्या आहेत. श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी घरोघरी लगबग सुरू आहे. गजबजलेल्या बाजारपेठा, मिठाईच्या दुकानांमध्ये लागलेल्या रांगा, झांजा-ढोल यांच्या दुकानातील गर्दी हे चित्र दरवर्षीप्रमाणे यंदाही दिसत आहे. पाटांवर दिमाखात विराजमान झालेल्या मूर्ती, कुठे तांडव करणारा बाप्पा, कुठे पुस्तक वाचणारा बाप्पा, सिंहासनावर विराजमान झालेला बाप्पा, गरुड, मोर यांच्यावर आरुढ असलेला वरदविनायक जणू गणेशभक्तांच्या घरी जाण्याची वाट पाहत असल्याचं चित्र आहे. आज गणेशचतुर्थीला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हे बाप्पा दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशभक्तांच्या घरी आनंदाने पाहुणचार घेतील.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!