Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

गांधीनगरमधून भाजप अध्यक्ष अमित शाह आज दाखल करणार उमेदवारी अर्ज; भव्य रोड शो, नेत्यांची मांदियाळी

Share

गांधीनगर | वृत्तसंस्था 

भाजप अध्यक्ष अमित शाह आज गुजरात राज्यातील गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांचे गांधीनगरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन होणार असून गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी करून ठेवली आहे.

अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजप आणि एनडीएचे अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. यामध्ये राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, प्रकाश सिंह बादल, रामविलास पासवान यांचा समावेश आहे.

दरम्यान, भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नाव असलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी वयोमानामुळे अमित शाह यांच्या रोड शोमध्ये सहभागी होणार नसल्याची माहिती एका वरिष्ठ भाजप नेत्याने दिली.

भाजप व शिवसेनेची युती झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील अमित शहांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

उद्धव म्हणाले,  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन मी अमित शहांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. शिवसेना भाजपत काही मतभेद होते, पण आम्ही ते मिळून दूर केले. पाठीत खंजीर खुपसणं हे आमचे संस्कार नाहीत. मी इथे अमित शाहांना पाठिंबा देण्यासाठी आलो असून निर्मळ मनाने आलो असल्याचे ठाकरे म्हणले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!