बाप्पांना भावपूर्ण निरोप

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- ढोल ताश्यांचा निनाद, पारंपरिक वाद्यांचा सूर, पारंपरिक पोशाख व फुलांची उधळण करत भावपूर्ण वातावरणात नगर शहरासह जिल्हाभरात विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्यात आला. संगमनेर, राजूर, कोपरगाव येथील हाणामारीच्या घटनांनी गालबोट लागले. नगर, राहुरी, श्रीरामपूर, अकोले, राहाता, नेवासा, शेवगाव तसेच ठिकठिकाणी गणरायांची मिरवणूक काढण्यात आली होती. ग्रामीण भागातही उत्साह होता. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात श्रीगणेशाला निरोप देण्यात आला. पुणतांब्यात पावसाने हजेरी लावल्याने पावसात चिंब होत पुणतांबेकरांनी जल्लोषात निरोप दिला.

LEAVE A REPLY

*