Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

PUBG खेळताना तो पाणी म्हणून अ‍ॅसिड प्यायला

Share

भोपाळ : ऑनलाईन गेममुळे अनेक अपघातांना आमंत्रण दिल्याचा सर्वांना माहित आहे. काही दिवसांपूर्वी ब्लू वेल गेमची दहशत होती. या गेमच्या आहारी जात काही जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. दरम्यान, सध्या पबजी गेमची क्रेझ असून त्याविरोधात देखील सध्या समाजाच्या विविध स्तरातून आवाज उठवला जात आहे. तरूणाईसह सर्वच वयोगटातील लोकांना याची भुरळ पडल्याचं, लोक त्याच्या आहारी गेल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, या पबजी गेम खेळण्यात गुंग झालेला युवक पाणी म्हणून अ‍ॅसिड प्यायला.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पबजी गेम खेळण्यात व्यस्त असणाऱ्या या मुलाचे लक्ष मोबाइलमध्ये होते. गेम खेळता खेळताच पाणी पिण्यासाठी पाण्याऐवजी चुकून अ‍ॅसिडची बाटली उचलून तोंडाला लावली. पाण्याऐवजी अ‍ॅसिड प्यायल्यानंतर पोटात जळजळ होऊ लागल्यावर या मुलाला त्याने केलेली चूक लक्षात आली.

घरच्यांनी लगेच त्याला जवळच्या रुग्णालयात हलवले. तेथे डॉक्टर मनन गोईया यांनी या मुलाच्या आतड्यांवर शस्त्रक्रिया केली. वेळीच उपचार मिळाल्याने या मुलाचे प्राण वाचले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. गेम खेळण्याच्या नादात काय पितोय याचे भानच न राहिल्याने हा विचित्र अपघात घडल्याचे या तरुणाच्या घरच्यांनी सांगितले आहे. सध्या या विचित्र अपघाताची चर्चा छिंडवाडामध्ये होताना दिसत आहे.

अ‍ॅसिड प्यायल्यानंतर तरूणाला तात्काळ रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर नागपूरमध्ये उपचार सुरू असून त्याच्या जीवाला असलेला धोका टळला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!