Gallery : ‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो’चा समारोप ; तीन दिवसात हजारो नागरिकांच्या विश्वासार्हतेची मोहोर

0

नाशिकरोड : मध्यमवर्गीय ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यातील विश्वासार्ह सेतूची निर्णायक भूमिका वठवणार्‍या ‘देशदूत’च्या ‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो’ प्रदर्शनावर हजारो नागरिकांनी ठसठशीत मोहोर उमटवली. तीन दिवसीय प्रदर्शनाचा आज सायंकाळी उत्साहात समारोप झाला.

जेलरोडवरील सेंट फिलोमिना शाळेसमोर आयोजित या प्रदर्शनात नाशिकरोड परिसरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक, गृह वित्तपुरवठादार संस्था, अंतर्बाह्य सजावटकार संस्था आणि तत्सम स्टॉलधारक सहभागी झाले होते. तीन दिवसात असंख्य नागरिकांनी सहकुटुंब भेट देऊन आपल्या स्वप्नातील घरावर शिक्कामोर्तब केले. आज प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

याप्रसंगी आनंद ट्रान्सपोर्टचे संचालक शम्मीशेठ आनंद, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. तुषार देवरे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलासराज गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. ‘देशदूत’ परिवारातर्फे कार्यकारी संपादक मिलिंद सजगुरे, जाहिरात उपव्यवस्थापक आनंद राईकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनात सहभागी स्टॉलधारकांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

या प्रदर्शनामुळे मध्यमवर्गीयांना त्यांच्या पसंतीची घरे शोधण्याचे स्वातंत्र्य ‘देशदूत’च्या माध्यमातून मिळाल्याचे गौरवोद्गार प्रदर्शनास भेट देणार्‍यांनी काढले. याशिवाय नाशिकरोड परिसरातील बांधकाम प्रकल्पांना उत्तेजना देणारे हे प्रदर्शन नागरिकांच्या कायम स्मरणात राहील, असेही नागरिकांनी बोलून दाखवले.

LEAVE A REPLY

*