Gallery : नववर्षाच्या स्वागतासाठी गोदेकाठी वाजले चारशे ढोल, १०० ताशे

0

पंचवटी, ता. २५ : नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे भाजीबाजार पटांगण, गोदाकाठ येथे आज सायंकाळी ७ वाजता महावादन करण्यात आले.

यावेळी विविध १५ ढोलपथकातील ४०० ढोलवादक आणि १०० ताशेवादक तरुण तरुणींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

सायंकाळच्या वेळेस ढोलताशांच्या शिस्तबद्ध आणि धीरगंभीर आवाजाने गोदाकाठ भारावून गेला.

यावेळी शेकडो नाशिकरांनी हा अनोखा कार्यक्रम याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी गर्दी केली होती.

नववर्ष स्वागत समितीतर्फे दरवर्षी ढोलवादनाचा कार्यक्रम येथे होतो. यावेळी महारांगोळीही रेखाटण्यात आली.

(छायाचित्रे : अमोल गंभीरे, देशदूत)

LEAVE A REPLY

*