Type to search

Featured आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

नितीन गडकरींचा पाकिस्तानला पाणीकोंडीचा इशारा

Share

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला पाणी कोंडीचा इशारा दिला आहे. भारत सिंधू पाणी वाटप कराराचा अभ्यास करत आहे. पाकिस्तानच्या दिशेने वाहणारे पाणी भविष्यात राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या दिशेने वळवण्यात येईल असे गडकरी यांनी सांगितले.

पाकिस्तानला तीन नद्यांमधून पाणी जाते. शांतता आणि मैत्री संबंधांच्या आधारावर भारत-पाकिस्तामध्ये पाणी वाटप करार झाला होता. पण आता ही गोष्ट उरलेली नाही. त्यामुळे हा करार पाळणे आमच्यासाठी बंधनकारक नाही असे गडकरी यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानकडून दहशतवादाचे समर्थन सुरु आहे. पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवले नाही तर पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय उरणार नाही. त्यामुळे भारताने या पाणी वाटप कराराचा अभ्यास सुरु केला आहे. पाकिस्तानऐवजी हरियाणा, राजस्थान आणि पंजाबला हे पाणी मिळेल असे गडकरी म्हणाले. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही भारताने पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्याचा इशारा दिला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!