बहुप्रतीक्षित रेडमी ९चा आज सेल; पाहा वैशिष्ट्ये

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | प्रतिनिधी

रेडमीचा बहुप्रतीक्षित रेडमी ९ या स्मार्टफोनचा आज पहिला सेल आहे. आज दुपारी १२ वाजता या सेलला सेलला सुरुवात होईल. कमी किंमतीतील या फोनची वैशिष्ट्ये पाहा…

गेल्या आठवड्यातचा हा फोन भारतात लाँच करण्यात आला होता. अॅमेझॉन आणि एमआय च्या अधिकृत साईटवर हा फोन ग्राहकांना खरेदी करता येईल.

या फोनमध्ये दोन कॅमेरा आणि वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजसोबत येणाऱ्या या फोनची सुरुवातीची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे.

या फोनमध्ये ६.५३ इंचाचा एचडी प्लस डॉट ड्रॉप डिस्प्ले दिला आहे. यात ड्यूल नॅनो सिम सपोर्ट येत असून हा फोन अँड्रॉयड १० वर बेस्ड MIUI 12 ऑफर केला आहे.

फोनच्या रियरमध्ये फोटोग्राफीसाठी दोन कॅमेरे दिले आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

५१२ जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट आणि रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. फोन १० वॉटच्या चार्जिंगला सपोर्ट करतो. फोन कार्बन ब्लॅक, स्काय ब्लू आणि स्पोर्टी ऑरेंज या तीन कलरमध्ये उपलब्ध आहे.

कनेक्टिविटीसाठी रेडमी ९ मध्ये 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ आणि मायक्रो यूएसबी पोर्ट यासारखे ऑप्शन देण्यात आले आहे. फोन चे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे यात 3.5mm ऑडियोजॅकदिला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहक या फोनच्या प्रतीक्षेत होते. अखेर आज हा फोन ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. अनेकांनी दुपारी बारा वाजेची वेळ या फोनच्या बुकिंगसाठी राखून ठेवली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *