WhatsAppच्या लुकमध्ये होणार बदल, सोबत असतील 'हे' ॲडव्हान्स फिचर्स

WhatsAppच्या लुकमध्ये होणार बदल, सोबत असतील 'हे' ॲडव्हान्स फिचर्स

नवी दिल्ली | New Delhi

व्हॉट्सॲप हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. ज्याचा वापर आपण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो. whatsapp वेळोवेळी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन अपडेट्स आणत असते.

WaBetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार WhatsAppआता नवीन डिझाईनमध्ये दिसणार आहे. अशातच व्हॉट्सॲप युजर्ससाठी नवीन फीचर (Feature) आणत आहे. या भन्नाट फीचरमुळे युजर्स आपले व्हॉट्सॲप स्टेटस थेट फेसबुकवर पोस्ट करु शकतात.

सध्या व्हॉट्सॲपकडून या नवीन फीचरवर काम सुरु आहे. याशिवाय व्हॉट्सॲप एका मोठ्या प्रायव्हसी फीचरवर देखील काम करत आहे. ज्यामुळे तुम्हाला चॅट लॉक आणि झालेल्या संवाद लपवता येणार आहे.

WhatsAppच्या लुकमध्ये होणार बदल, सोबत असतील 'हे' ॲडव्हान्स फिचर्स
अन् चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ५० प्रवाशांचे प्राण

यासोबतच कॉन्टॅक्ट इन्फो सेक्शनमध्येही चॅट लॉक करण्याचा पर्याय दिसणार आहे. लोक चॅटसाठी पासकोड आणि फिंगरप्रिंट लॉक सेट करू शकतील. हे फीचर लवकरच सुरू होणार आहे.

WhatsAppच्या लुकमध्ये होणार बदल, सोबत असतील 'हे' ॲडव्हान्स फिचर्स
Video : बोटीवर अचानक चढली महाकाय मगर; युवकांनी जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का

मेटाने Whatsappची ओनरशिप घेतल्यानंतर नवनवीन अपडेट्स आणि फीचर्स यामध्ये येत आहेत. दरम्यान Whatsappच्या नव्या फीचर्सबद्दल माहिती देणाऱ्या WABetainfo ने दिलेल्या माहितीनुसार Whatsappचे यूजर्स इंटरफेस (UI)पुढील काही अपडेट्सनतंर पूर्णपणे बदलणार आहे.

दरम्यान, कंपनीने केलेल्या क्लीन UI टेस्टिंगनंतर आता अँड्रॉईडमध्येही IOS म्हणजेच आयफोनप्रमाणे इंटरफेस दिला जाणार आहे. त्यामुळे आता अँड्रॉईड वापरकर्त्यांना आयफोनप्रमाणे सर्व टॅब्स या खालच्या बाजूला दिसणार आहेत.

WhatsAppच्या लुकमध्ये होणार बदल, सोबत असतील 'हे' ॲडव्हान्स फिचर्स
पाणी टंचाईला सामोरे जाण्यासाठी पालकमंत्र्यांनी केल्या सूचना

जर तुम्हाला एकच स्टेटस फेसबुकवर शेअर करायचं असेल आणि दुसरं Whatsapp शेअर करायचं असेल तर ही सहज शक्य होणार आहे. मात्र, सध्या या फीचरवर काम सुरु असून लवकरच ते लॉन्च होईल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

हे नवीन फीचर बहुतांश लोकांच्या पसंतीस उतरु शकते. तसेच या फीचरमुळे लोकांच्या वेळेची देखील बचत होणार आहे. सध्या जगभरात दोन बिलियनपेक्षाही जास्त व्हॉट्सॲप युजर्स आहेत, तसेच व्हॉट्सॲप जास्तीत जास्त युझर फ्रेंडली बनवण्यासाठी मेटाकडून बऱ्याच नवीन फीचर्सवर काम केले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकांना व्हॉट्सॲप स्टेटसवर व्हॉईसनोट, व्हॉट्सॲपच्या युआयमध्ये चेंजेस आणि इंडिव्हिज्युअल चॅटवर लॉक असे काही बदलेले फीचर्स पाहायला मिळू शकतात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com