Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedआता व्हॉट्सअ‍ॅपवरच करता येणार फोटो, व्हिडीओ एडीट; 'अशी' आहेत वैशिष्ट्ये

आता व्हॉट्सअ‍ॅपवरच करता येणार फोटो, व्हिडीओ एडीट; ‘अशी’ आहेत वैशिष्ट्ये

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपल्या युझर्ससाठी नेहमीच नवनवीन फीचर्स (New Features) आणण्याचा प्रयत्न करत असते. आता व्हॉट्सअ‍ॅप कंपनी काही नवीन फिचरवर काम करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच हे फिचर्स कंपनी आपल्या युझर्ससाठी लॉन्च करू शकते…

- Advertisement -

ड्रॉईंग टूल

कंपनी अपडेटेड व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ड्रॉईंग टूल (Drawing Tools) देणार असून यात नवे पेन्सिल आयकॉन असेल. या आयकॉनच्या माध्यमातून फोटो (Photo) आणि व्हिडीओ (Video) फॉरवर्ड करण्याआधी त्यावर एडिटिंग (Editing) करणे शक्य होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पेन्सिल फीचर आधीपासूनच उपलब्ध आहे. मात्र आता युझर्सला पेन्सिलचे बारीक आणि जाड असे पर्याय उपलब्ध केले जातील. ज्यामुळे युझर्सचा ड्रॉईंगचा अधिक चांगला होईल.

अमेरिकेतील ५ जीमुळे विमानांना धोका; एअर इंडियाची २० विमाने रद्द

ब्लर इमेज टूल

भविष्यात व्हॉट्सअ‍ॅप ब्लर इमेज टूलदेखील (Blur Image Tool) आणणार आहे. हे फीचर व्हॉट्सअ‍ॅप बीटा अँड्रॉइड २.२२.३.५ अपडेटमध्ये होते. मात्र ते डिसेबल करण्यात आले आहे. या फिचरवर कंपनी सद्या काम करत आहे. लवकरच बीटा युझर्ससाठी हे फीचर येण्याची शक्यता आहे.

Visual Story : अबब! ‘पुष्पा’च्या आयटम साँगसाठी समांथाने आकारले पाच कोटी

नोटिफिकेशन सेटिंग्ज मॅनेज

व्हॉट्सअ‍ॅपच्या आयओएस (IOS) युझर्सला नोटिफिकेशन सेटिंग्ज (Notification settings) मॅनेज करण्याचा पर्यायदेखील मिळणार आहे. ज्यात कोणत्या चॅट (Chat) किंवा ग्रुप चॅटचे (Group chat) नोटिफिकेशन प्राप्त करायचे आहेत याबाबतची माहिती सेट करता येईल. नोटिफिकेशन साऊंडही (Notification sound) मॅनेज करता येतील.

सरकारने केले सिमकार्डच्या नियमांत बदल; जाणून घ्या

डार्क मोड

याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपच्या डेस्कटॉप युझर्सला नवीन चॅट बबल कलर मिळणार आहे. ज्यात डार्क मोड (Dark Mode) वापरताना युझर्सला नवीन ‘गडद निळा’ रंग मिळेल. हे अपडेट विंडोज आणि मॅक ओएस अ‍ॅपसाठी येणार आहे. जे व्हॉट्सअ‍ॅप बीटा डेस्कटॉप २.२२०१.२.० मध्ये चॅट बबल हिरवे करेल. यामुळे चॅट बार आणि बॅकग्राऊंडचा रंगदेखील बदलणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या