मुंबई । Mumbai
संपूर्ण जगभरात व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे एक लोकप्रिय सोशल मीडिया (social media) माध्यम असून व्हॉट्सअॅपमधील सर्व वैशिष्ट्ये आणि त्याची विनामूल्य मिळणारी सेवा यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहे. परंतु अलीकडेच मेटाच्या (meta) मालकीच्या या कंपनीने व्हॉट्सअॅप प्रीमियम सेवा (WhatsApp premium service) जाहीर केली असून ही सशुल्क सेवा असणार आहे…
व्हॉट्सअॅप प्रीमियम ही व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी किंवा विविध कंपन्या आणि संस्थांसाठी सदस्यत्व आधारित सेवा आहे. यामध्ये, युजर्सना (users) त्यांच्या व्यावसायिक खात्यांमध्ये व्हॅनिटी युआरएल (Vanity URL) पूर्वीपेक्षा अधिक लिंक केलेले डिव्हाइसेस, यासारखे अतिरिक्त फीचर्स मिळतील. याच्या लॉन्चिंगबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी येत्या २ ते ३ महिन्यांत हे फीचर (feature) प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच मेटाने (meta) अद्याप या सेवेचे अनावरण केलेले नाही आणि त्याच्याशी संबंधित जास्त माहिती देखील शेअर केलेली नाही. इतके असूनही वेगवेगळ्या रिपोर्ट्समध्ये त्याचे फीचर्स सांगण्यात येत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, यामध्ये यूजर्सना असे अनेक खास फीचर्स मिळतील, ज्याचा त्यांना खूप फायदा होईल.
व्हॉट्सअॅप यूजर्सना मिळू शकतात हे फीचर्स
दहा डिव्हाइस केले जाऊ शकतात लिंक
तुम्ही आता व्हॉट्सअॅपची सामान्य व्हर्जन चार डिव्हाइसमध्ये रन करू शकता, परंतु प्रीमियम सेवेत तुम्हाला दहा अतिरिक्त डिव्हाइस जोडण्याचा पर्याय मिळू शकतो. याच्या मदतीने अनेक लोक कंपनीच्या पेजवर नजर ठेवू शकतील.
व्हॅनिटी युआरएल (Vanity URL)
व्हॉट्सअॅप प्रीमियममध्ये, वापरकर्त्यांना व्हॅनिटी युआरएलची सुविधा देखील मिळू शकते. म्हणजेच, त्याच्या वापरकर्त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी कस्टम लिंक्स जनरेट करण्याचा पर्याय मिळेल.
व्हॉट्सअॅप प्रीमियम व्हॅनिटी युआरएल (WhatsApp Premium Vanity URL)
तज्ञांच्या मते, जेव्हा युजर व्हॅनिटी युआरएल (User Vanity URL) तयार करतो तेव्हा त्याचा व्यावसायिक फोन नंबर लपविला जात नाही. जेव्हा ग्राहक तुमच्याशी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधतील तेव्हा त्यांना फोन नंबर दिसेल. तथापि, व्यवसायाच्या नावासोबत एक लहानसे कस्टम युआरएल बनवणे याला अधिक चांगले बनवते.