WhatsApp आणत आहे 'हे' नवीन फीचर्स

WhatsApp आणत आहे 'हे' नवीन फीचर्स
WhatsApp

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) अँड्राइड (Android) 2.21.13.17 अपडेटमध्ये यूजर्ससाठी दोन नवीन फीचर्स (Features) आणणार आहे. सध्या हे फीचर्स बीटा व्हर्जन (Beta version) वापरणाऱ्यांसाठी उपलब्ध झाले आहे. पुढील काही दिवसात सर्व यूजर्सला हे फीचर्स वापरता येतील....

नवीन अपडेटमध्ये यूजर्स आता कॉन्टॅक्ट्सला स्टिकर पॅक्स फॉरवर्ड (Forward) करू शकणार आहेत. यूजर्स केवळ WhatsApp वरून डाउनलोड (Download) केलेलेच sticker packs फॉरवर्ड करू शकतील.

डिझाइनसंदर्भातही (Design) बदल करण्यात आला आहे. WhatsApp ने वॉइस नोट (Voice Note) रिडिझाइन केले आहे.

याआधी वॉइस नोटमध्ये प्ले-पॉझ बटनच्या बाजूला सरळ लाइन दिसत असे. आता वॉइस नोट सुरू असताना यूजर्सला वेवफॉर्म (waveform) दिसणार आहे. तसेच आयफोन (Iphone) यूजर्सला WhatsApp स्टिकर पॅक्स आधीपासूनच फॉरवर्ड करता येतात.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com