Friday, April 26, 2024
HomeUncategorizedव्हॉट्सॲपमध्ये पाच नवे फिचर्स येणार; जाणून घ्या सविस्तर

व्हॉट्सॲपमध्ये पाच नवे फिचर्स येणार; जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

व्हॉट्सॲपच्या नवीन फिचर्सबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. व्हॉट्सॲप सध्या काही फिचर्सवर काम करत आहे. हे फीचर्स लवकरच आयओएस आणि अँड्रॉइड फोन्सवर सुरु होण्याची शक्यता आहे…

- Advertisement -

‘Disappearing’ फिचरचा विस्तार केला जाणार आहे. त्याला ‘व्ह्यू वन्स’ असा ऑप्शन जोडला जाणार आहे. या फिचरच्या मदतीने युजर जो फोटो किंवा व्हिडीओ शेअर करेल तो केवळ एकदाच बघता येणार आहे. तसेच कंपनी आता व्हॉट्सॲपच्या वेब व्हर्जनलाही कॉलिंग फिचर देऊ शकते. असे माहिती कंपनीने दिली आहे.

डिसअपिअर मोड

कंपनी Disappear मोडचा विस्तार करीत आहे. यामुळे युजरला प्रत्येक चॅट थ्रेडस Disappearing मेसेज इनेबल करण्याची परवानगी मिळेल. सध्या Disappearing फिचर्स प्रत्येक चॅटसाठी मॅन्युअली सुरु करावे लागते. एकदा इनेबल केल्यानंतर मेसेज काही वेळानंतर डिलीट होतो. नव्याने या फिचरचा विस्तार होत असला तरी त्यासाठी युजरला टाईमर मिळेल का याबाबत कंपनीने कुठलीही माहिती दिलेली नाही.

मल्टी डिव्हाईस सपोर्ट

व्हॉट्सॲप मल्टी डिव्हाईस सपोर्ट हे फिचर टेस्टींग करीत आहे. लवकरच हे फिचर लॉन्च होण्याची शक्यता आहे. हे फिचर एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड असणार आहे.

रिड लॅटर

कंपनीचे रिड लॅटर या फिचरवर देखील काम सुरु आहे. हे फिचर ‘अर्काईव्ह चॅट’ या फिचरला रिप्लेस करण्याची शक्यता आहे. सध्याच्या व्हॉट्सॲपमध्ये तुम्ही कोणाचे चॅट अर्काइव्ह केले तर तसे चॅटवर दिसते. या फिचरमुळे तुम्हाला ते दिसणार नाही.

व्ह्यू वन्स

हे फिचर इन्स्टासारखेच असणार आहे. या फिचरच्या मदतीने युजर जो फोटो किंवा व्हिडीओ शेअर करेल तो फोटो किंवा व्हिडीओ अन्य युजरला केवळ एकदाच पाहता येणार आहे. जर तुम्ही एखाद्या अन्य युजर फोटो पाठवला आणि तो त्या युजरने पाहिला कि त्यानंतर लगेचच तो फोटो Disappear होईल. हे फिचर वापरण्यासाठी तुम्हाला व्ह्यू वन्स फिचरचा मोड ऑन करावा लागेल.

मिस्ड ग्रुप कॉल

चुकून ग्रुप कॉल मिस केला तर तुम्ही तो पुन्हा जॉईन करु शकता. म्हणजे जर एखादी व्यक्तीने तुम्हाला व्हिडीओ कॉल जॉईन करण्यासाठी आमंत्रित कारीत असेल, तुम्ही तो जॉईन केला नाही तर काही वेळाने तुम्ही तो जॉईन करू शकाल.

- Advertisment -

ताज्या बातम्या