व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच येणार 'हे' खास फीचर

व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच येणार 'हे' खास फीचर

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) कंपनी नेहमीच आपली युजर्ससाठी नवनवीन अपडेट्स घेऊन येते. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच आपल्या युजर्ससाठी इन्स्टाग्राम (Instagram), ट्विटर (Twitter) सारखे लॉन्च करणार आहे...

आता कंपनी मेसेज रिअ‍ॅक्शन (Message reaction) फीचरवर काम करत आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्स चॅटमध्ये (Chat) आलेल्या मेसेजवर रिअ‍ॅक्शन देऊ शकतील.

यामुळे चॅट एक्सपिरिअन्स (Chat experience) आणखी मजेशीर होईल. सध्या हे फीचर फेसबुक (Facebook) आणि फेसबुक मेसेंजरवर (Facebook Messenger) उपलब्ध आहे.

सध्या या फीचरची टेस्टिंग (Testing) सुरु आहे. लवकरच हे फीचर लॉन्च केले जाईल. हे फीचर रोलआउट झाल्यानंतर केवळ व्हॉट्सअ‍ॅपचे लेटेस्ट व्हर्जन (WhatsApp Latest Version) वापरणाऱ्या युजर्ससाठी उपलब्ध असेल. जुने व्हर्जन वापरणाऱ्यांना हे फीचर वापरण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करण्याचे सांगितले जाईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com