Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedव्हॉट्सअ‍ॅपच्या 'या' फीचरमुळे पर्सनल चॅट लपवता येणार

व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘या’ फीचरमुळे पर्सनल चॅट लपवता येणार

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्या अ‍ॅपमध्ये अनेक अपडेट करत असते. आता व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या अ‍ॅपमध्ये एक नवीन फीचर (New feature) अ‍ॅड केले आहे…

- Advertisement -

हे फीचर जे युजर्स आपली पर्सनल चॅट लपवू इच्छितात त्यांच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आर्काइव्ड चॅट फीचर (WhatsApp Archived Chats) सुरु केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच आपल्या आर्काइव्ड चॅट सेटिंग्स (WhatsApp Archived Chats) फीचरमध्ये बदल केले आहेत. हे फीचर इनेबल (Enable) करुन नवे मेसेज हाईड (Message hide) करता येऊ शकतात. नव्या फीचरमुळे, आर्काइव्ड चॅटमध्ये एखादा नवा मेसेज आला, तरीदेखील ते चॅट आर्काइव राहील.

याआधी आर्काइव चॅटमध्ये एखादा नवा मेसेज आल्यास, तो अनआर्काइव (Unarchive) व्हायचा. परंतु आता तुमच्या एखाद्या आर्काइव चॅटमध्ये नवा मेसेज आला तरी तो आता दिसणार नाही.

कंपनीने हे फीचर Android आणि iOS दोन्ही युझर्ससाठी सुरु केले आहे. नवा मेसेज आल्यावर आर्काइव चॅट मेन चॅट लिस्टमध्ये येत होते, जे की आर्काइव फोल्डरमध्येच असणे गरजेचे असल्याची मागणी अनेक युझर्सकडून होत होती. आता या फीचरमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या