व्हॉट्सॲपवर प्रायव्हसी जपताय? बातमी तुमच्यासाठी

व्हॉट्सॲपवर प्रायव्हसी जपताय? बातमी तुमच्यासाठी

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे कंपनी नवनवीन फीचरवर (New Feature) सातत्याने काम करत आहे...

व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने (WhatsApp) आपली प्रायव्हसी सेटिंग (Privacy Setting) अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून युजर्स कॉन्टॅक्टमधूनच आपले प्रोफाईल फोटो (Profile Photo), स्टेटस अपडेट (Status Update) आणि लास्ट सीन (Last Seen) लपवू शकणार आहेत.

हे नवीन फीचर अशा युजरसाठी महत्त्वाचे ठरणार आहे की, ज्यांना त्यांचे फोटो, स्टेटस आणि लास्ट सीन काही लोक वगळून इतर सर्वांना दिसावे असे वाटते. युजरला सध्या तीन पर्याय उपलब्ध आहेत. यात Everyone, My Contacts किंवा Nobody अशा पर्यायांचा समावेश आहे.

हे अपडेट अँड्रॉईड (Android) आणि आयओएस (iOS) प्लेटफॉर्मसाठी उपलब्ध होणार आहे. या नव्या अपडेटमध्ये ‘My Contact Except’ असा पर्याय मिळणार आहे. जो आधी केवळ Everyone, my contacts आणि Nobody असा होता.

एखादा युजर दुसऱ्या कॉन्टॅक्टसाठी आपले लास्ट सीन लपवत असेल तर युजरला त्या कॉन्टॅक्टचेही लास्ट सीन दिसणार नाही. अशाचप्रकारे स्टेटससाठीदेखील ज्या कॉन्टॅक्टला युजरने डिसेबल केले आहे त्याचे अ‍ॅक्टिव्ह स्टेटस युजरला पाहता येणार नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com