
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
व्हॉट्सअॅप (WhatsApp) कंपनी नेहमीच आपल्या युझर्ससाठी नवनवीन अपडेट्स घेऊन येते. सध्या कंपनी अॅनिमेटेड आयकॉन्स असलेल्या अवतार पॅकच्या सुधारित व्हर्जनवर काम करत आहे...
याचा वापर युजर्स चॅटिंग दरम्यान अॅनिमेटेड अवतार पाठवू शकतील. या नवीन अपडेची माहिती व्हॉट्सअॅपच्या आगामी फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या Webetainfo ने शेअर केली आहे.
हे नवीन फीचर्स (Feature) अॅनिमेटेड अवतार पॅकमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध असेल. सध्या हे फीचर WhatsApp बीटा Android 2.23.16.12 या युजर्सना वापरता येणार आहे. हे लेटस्ट फीचर वापरण्यासाठी बीटा युजर्सला Google play Store वरुन लेटस्ट बीटा वर्जन अपडेट करावे लागेल.
Wabetainfo ने एक अॅनिमेटेड इमेज शेअर केली आहे, जी अवतार आवृत्ती दर्शवते. कोणाशीही चॅट करत असताना, वापरकर्ते त्यांचा अॅनिमेटेड अवतार सहज पाठवू शकतील. सध्या या फीचरवर काम केले जात असून ते अनेक डायनॅमिक अवतारात दिसत आहे.
हे फीचर वापरण्यासाठी यूजर्सला चॅटिंगमध्ये (Chat) जाऊन अवतार टॅबवर क्लिक करावे लागेल. जर अवतारासाठी काही अॅनिमेशन्स असतील तर याचा अर्थ युजर्सला या अॅनिमेशन अवतारची सुविधा मिळाली आहे असे होईल.