विवोकडून वाय५२एस लॉन्च

ग्राहकांना मिळणार धमाकेदार फिचर्स
विवोकडून वाय५२एस लॉन्च

मुंबई | Mumbai

विवोकडून आपला नवा स्मार्टफोन विवो वाय५२एस लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये सुरक्षिततेसाठी साइड-माउटेंड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक फिचर दिले गेले आहे.

या स्मार्टफोनमध्ये सुरक्षिततेसाठी साइड-माउटेंड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक फिचर दिले गेले आहे. या व्यतिरिक्त युजर्सला विवो वाय५२एस मध्ये एचडी डिस्प्ले, Snapdragon 480 प्रोसेसर आणि 5,000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे.

विवो वाय५२एस स्मार्टफोन डुअल सिम सपोर्टसह येणार आहे. हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 11 आधारित Origin OS 1.0 वर काम करणार आहे. तसेच फोनमध्ये 6.58 इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी दिला आहे. ज्याचे रेज्यॉल्यूशन 1080X2408 पिक्सल आहे. त्याचसोबत यामध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज दिला गेला आहे.

कंपनीने Vivo Y52s मध्ये उत्तम परफॉर्मेन्ससाठी डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये पहिला 48MP चा प्रायमरी कॅमेरा सेंसर आणि दुसरा 2MPचा डेप्थ सेंसर दिला आहे. तर याच्या फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com