Friday, May 10, 2024
HomeUncategorizedVivo V20 भारतात लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ठे

Vivo V20 भारतात लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ठे

स्मार्टफोन कंपनी Vivo ने आज आपला नवीन फोन Vivo V20 भारतात लॉन्च केला आहे. गेल्या महिन्यात कंपनीने थायलंडमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला होता.

Vivo V20 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आणि फास्ट चार्जिंग सारख्ये फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच 6.44 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे. ज्यामध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशन आहे.

- Advertisement -

हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत स्टोरेजसह येतो. यात स्नॅपड्रॅगन 720 जी एसओसी प्रोसेसर आहे. याशिवाय मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने तुम्ही फोनची मेमरी वाढवू शकता.

या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर आहे. याशिवाय यात 8 मेगापिक्सलचा वाइड-अँगल शूटर आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर देण्यात आले आहे.

सेल्फीसाठी तुम्हाला या फोनमध्ये 44 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. याशिवाय या फोनमध्ये 4000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या